कागलच्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गुरुवारपासून धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कागलच्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सवानिमित्त गुरुवारपासून धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कागल (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी(ता.१९)ते गुरुवार (ता.२६) यादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक  कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये भजन माला, प्रवचन माला, संगीतमय सुंदरकांड पाठ,प्रवचन, भक्ती गीते व भरतनाट्यम,कथ्थक आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.श्रीराम मंदिर देवस्थान जिर्णोद्धार समिती यांनी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

गुरुवारी(ता.१९)सायंकाळी  चार वाजता स्वरांजली वाघुर्डेकर प्रस्तुत श्रीरामाचे अभंग व भक्ती गीतांचा कार्यक्रम होईल.तर सहा वाजता कांचनमाला धबाले यांचे प्रवचन होईल. शुक्रवारी(ता.२०) सायंकाळी  चार वाजता स्वानंद महिला भजनी मंडळाचे भजन तर  सहा वाजता निलीमा देशपांडे यांचे प्रवचन होईल. शनिवारी(ता.२१)सायंकाळी चार वाजता योगिनी महिला मंडळ इचलकरंजी यांचे भजन तर  सहा वाजता विजयाताई अडसूळ यांचे प्रवचन होईल.

रविवारी(ता.२२)सायंकाळी चार वाजता ज्ञानज्योती महिला भजनी मंडळ इचलकरंजी यांचे भजन तर सहा वाजता कांचनताई जोशी यांचे प्रवचन होईल.सोमवारी (ता.२३)सायंकाळी चार वाजता राम सेवा भजनी मंडळ यांचे भजन तर सायंकाळी सहा वाजता अशोक कौलवकर महाराज यांचे प्रवचन होईल.

मंगळवारी(ता.२४) दुपारी साडेतीन वाजता मीनू पोद्दार, संजय पारख व जाॕयफुल सुंदरकांड ग्रुप पुणे यांचा संगीतमय सुंदरकांड पाठ होईल.सायंकाळी चार वाजता विश्वमांगल्य सभा महिला ग्रुप कागल यांचा रामरक्षा, रामनामावली व करुणाष्टक पठण कार्यक्रम होईल.बुधवारी(ता.२५)सायंकाळी साडेसात वाजता नर्मदा डान्स स्कूल ऑफ कोल्हापूर यांचा भरतनाट्यम तर रियाज गुलाब कथक कोल्हापुर यांचा कथक कार्यक्रम होईल. 

गुरुवारी(ता.२६) सकाळी दहा ते बारा या वेळेत राम सेवा भजनी मंडळ कागल यांचा भजनाचा कार्यक्रम होईल तर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा होईल.सुंठवडा व प्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होईल.यामध्ये भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.