कोल्हापुरात बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत; मुदतीनंतर २० हजार दंड अन् फौजदारी कारवाईचा इशारा

कोल्हापुरात बेकायदेशीर नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी १० दिवसांची अंतिम मुदत; मुदतीनंतर २० हजार दंड अन् फौजदारी कारवाईचा इशारा

 कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत करण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सभागृहात पाणीपुरवठा विशेष समितीची पहिली महत्त्वाची सभा पार पडली. समितीच्या सभापती संगीता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील पाण्याच्या टाक्या, बेकायदेशीर नळ कनेक्शन, गळती, पाणीपट्टी वसुली आणि भविष्यातील पाणी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली असून, अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांना आपले कनेक्शन रितसर करण्यासाठी फक्त १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कनेक्शन नियमित केल्यास आणि महापालिकेच्या तपासणी पथकाला बेकायदेशीर कनेक्शन आढळल्यास थेट २० हजार रुपये दंड आणि त्यानंतर संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा कठोर निर्णय यावेळी घेण्यात आला.

बैठकीतील प्रमुख निर्णय आणि मुद्दे:

·         रोबोद्वारे गळती शोध मोहीम : शहरातील पाणी गळती आणि दूषित पाण्याचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करण्यात आलेल्या दोन रोबोंच्या साह्याने सोमवारपासून तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे.

·         पाणी टाक्यांची देखभाल : शहरातील जुन्या नवीन अशा एकूण ३८ पाण्याच्या टाक्यांच्या नियमित देखभालीसाठी वार्षिक ठेका देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

·         पाणीपट्टी वसुलीवर भर : शहरात सुमारे लाख हजार घरगुती पाणी कनेक्शन्स असून, सुमारे ४१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसुलीला गती देण्यासाठी प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यावर ,५०० घरांच्या बिल वाटप वसुलीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच भविष्यात अचूक मोजमापासाठी डिजिटल मीटर बसवण्याचा विचार आहे.

·         पाणीपुरवठा वेळापत्रक : प्रभागनिहाय पाणी सोडण्याची वेळ निश्चित करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जात आहे.

·         पांमपिंग स्टेशन आणि ऑटोमेशन : बालिंगा पुईखडी येथील जुन्या यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली जाणार असून, पाणीपुरवठा व्यवस्थेच्या ऑटोमेशनसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होईल.

या बैठकीस पाणीपुरवठा विशेष समितीच्या उपसभापती  दीपा काटकर, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.