जि.प. स्थायी समिती सभेत पाणी, आरोग्य, बांधकाम प्रश्नावर चर्चा
कोल्हापूर( प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या बुधवार झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पाणी, आरोग्य, बांधकाम सह इतर मुद्द्यांवर सदस्यांकडून प्रश्न विचारण्यात आले सदस्याकडून विचारलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत होत्या.

सभेच्या सुरुवातीस सदस्य अमर पाटील यांनी जिल्हा परिषदेकडील प्राप्त निधी अखर्चित राहुन परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचना केली.तसेच ग्रामीण भागांत शेतकऱ्यांना पेरणी झाल्यानंतर कृषी विभागाकडून बी-बियाणांचा पुरवठा केला जातो. तरी शेतकऱ्यांना बी-बियाणे पेरणीपूर्वी पुरविणेची व्यवस्था करणेबाबतच्या सूचना कृषी विभागाला देणेत आल्या.
वनक्षेत्रामध्ये अनेक गावांतील शासकीय जमीनींचे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. 1 जानेवारी 2011 पुर्वीचे अतिक्रमणे नियमित करणे बाबतचा GR नुसार कार्यवाही करणे बाबत पुढील स्थायी समिती सभेवेळी वन विभाग व महसुल विभाग चे अधिकारी यांना बोलवणेत यावे. याबाबत अभिजित व सग्रामसिंह कुपेकर प्रश्न मांडले. ग्रामीण भागात खंताची टंचाई निर्माण झाली असुन त्यावर तात्काळ उपाय योजना करणेत यावी अशी मागणी सदस्य सुधीर देसाई यांनी केली.
आजरा घनसाळ उत्पादन व वितरणाची अधिकृत यंत्रणा जि.प., पंचायत समिती व तालुका संघ यांचे समन्वयाने तयार करुन उत्पादन वाढविणेसाठीचे नियोजन करावे. अशा सूचना अधिकाऱ्यांना उपाध्यक्ष तानाजी पाटील व सुधीर देसाई यांनी केल्या.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी टंचाईचा पुरवणी आराखडा तयार करणेत यावा. जी गावे टंचाईग्रस्त आहेत पण आराखड्यामध्ये त्यांचा समावेश नाही अशा गावांची यादी जिल्हा परिषद सदस्य यांचेकडून घेऊन त्याचा समावेश पुरवणी आराखड्यामध्ये करुन जिल्हाधिकारी यांचेकडे यांना सादर करावा असे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सांगितले.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयामध्ये चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनांचे अंदाजपत्रक गावांची गरज लक्षात न घेता 5 कोटीच्या मर्यादेत करण्यास संबंधित अधिकारी यांनी भाग पाडले. कारण 5 कोटीच्या वर अंदाजपत्रक गेलेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडे हस्तारीत होते. पंरतू त्यानंतर अनेक गांवाना सुधारित अंदाजपत्रक करावे लागले. चंदुर 5 कोटीचे 23 कोटी अंदाजपत्रककरावे लागले ही बाब सदस्य महेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिली.
गारगोटी पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे तरी हे काम जलद गतीने आणि तातडीने पुर्ण करण्याबाबतचा प्रश्न सदस्या रेश्मा राहुल देसाई उपस्थित केला. याचबरोबर आरोग्य विभागातील नोकर भरती तसेच जलजीवन मधील कामकाज यावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. सभेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांकडून योग्य पद्धतीने उत्तर देण्यात आली. सभेस अनुपस्थित असलेल्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबत अध्यक्ष खोत यांनी प्रशासनाला आदेश दिले.
यावेळी सभेस सर्व समिती सदस्य अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी इतर सर्व खोत प्रमुख उपस्थित होते.




