जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेत विविध योजना अंमलबजावणीचा निर्णय

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभेत विविध योजना अंमलबजावणीचा निर्णय

कोल्हापूर( प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन व दुग्ध शाळा विकास  समितीच्या या सभेत विविध योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी समिती सभापती तथा  उपाध्यक्ष तानाजी पाटील होते. 

 मागील आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या योजनांचा तालुका निहाय आढावा घेण्यात आला व सदर योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यामध्ये "शासकीय योजनेतील शेळ्यांची खरेदी ही स्थानिक स्त्रावरून करण्याच्या पशुपालकांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली व सदर शेळ्या शेळी मेंढी महामंडळ यांच्या रांजणी येथील प्रक्षेत्रावरून खरेदी करण्याची जाचक अट कोल्हापूर जिल्ह्यासाठी शिथिल करण्यात यावी" अशी मागणी समिति मार्फत करण्यात आली. 

  तसेच कडबाकुट्टी वाटपाकरिता अधिक प्रतिसाद व मागणी असल्याने सदर योजनेवरील निधी वाढवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पोहोचण्याकरिता योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व नामांकित बँक मार्फत वित्तीय मदत व कर्ज मंजुरी तात्काळपणे करण्यात यावी यासंदर्भात सर्व बँकांना पत्रव्यवहार करण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना  देण्यात आल्या.

   मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता अभियान" बाबत संपूर्ण माहिती समितीच्या सर्व सदस्यांना दिल्यात आलेली असून सदर योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता वाढीव अर्थसंकल्प जिल्हा नियोजन शाखेकडे सादर करण्याबाबत समिती सभापती तानाजी पाटील यांनी सूचना दिल्या.

   या पहिल्या सभेला समिती सदस्य अरुण जाधव, छाया देसाई, अर्चना चौगुले, नामदेव वाईंगडे, रचना गावडे, शैलजा पाटील, अश्विनी बिरांजे, प्रचिती कोळी तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.प्रमोद बाबर  यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.