देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फयेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त फयेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

गारगोटी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेने शिवसेना भुदरगड तालुका यांच्या वतीने भुदरगड तालुक्यातील दुर्गम धनगरवाडे येथील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. फये, गावठाण, बसुदेव धनगरवाडा येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने फये परिसरातील विद्या मंदिर फये गावठाण, जोशेवाडी, धनगरवाडा येथील शाळांमधील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्षस्थानी फयेचे सरपंच साताप्पा धुरे होते. 

यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख संग्राम सावंत म्हणाले की, दुर्गम भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे खरे औचित्य असल्याचे त्यांनी नमूद केले. 

यावेळी बोलताना विक्रमसिंह आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना शुभेच्छा देत शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.

यावेळी गारगोटीचे उपसरपंच भरत शेटके, शिवसेना उपतालुका प्रमुख साताप्पा कल्याणकर, शिवसेना विभागप्रमुख दयानंद आरेकर, शरद मोरे, बसरेवाडी माजी सरपंच संदीप पाटील, जितेंद्र भोसले, युवराज सुर्वे, युवराज फगरे, सुनिल रेडेकर, विशाल वायदंडे, दीगंबर देसाई, ओमकार पाटील, सुशांत भाटले, अरुण पाटील, संजय गुरव, अमोल मेश्राम, संदीप पाटील यांच्यासह शिवसैनीक उपस्थित होते. आभार निवृत्ती वैद्य यांनी मानले.