साईनाथ मल्टीस्टेटच्या आजरा शाखेचा २ रा वर्धापन दिन उत्साहात; सभासदांचा विश्वास हीच खरी ताकद – चेअरमन उत्तम जाधव

साईनाथ मल्टीस्टेटच्या आजरा शाखेचा २ रा वर्धापन दिन उत्साहात; सभासदांचा विश्वास हीच खरी ताकद – चेअरमन उत्तम जाधव

आजरा (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरणाला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात अत्यंत विश्वासार्ह वाटचाल करणाऱ्या 'साईनाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी'च्या आजरा शाखेचा २ रा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच भविष्यातील विस्तार आणि अत्याधुनिक सेवांचा रोडमॅप जाहीर करण्यात आला.

कार्यक्रमाला सभासद, ठेवीदार, हितचिंतक, विविध राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन उत्तम जाधव म्हणाले, संस्थेची प्रगती ही केवळ आकडेवारीची गोष्ट नसून हजारो सभासदांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे फलित आहे. ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी व हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच संस्था आज यशाच्या शिखरावर आहे. साईनाथ मल्टीस्टेट ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून हजारो कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेचा भक्कम आधार बनली आहे."

 भविष्यकालीन संकल्प आणि नवनवीन योजना

स्वमालकीच्या इमारती : भविष्यात संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या, आधुनिक व प्रशस्त इमारतींमध्ये सुरू करण्याचा संकल्प चेअरमन यांनी व्यक्त केला.

डिजिटल व पारदर्शक सेवा : डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करून ग्राहकांना जलद, पारदर्शक व ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर दिला जाईल.

आकर्षक पेन्शन योजना : कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या विविध बचत व कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यात ‘१ लाख रुपयांच्या ठेवीवर दरमहा ९०० रुपये पेन्शन’ (मासिक परतावा) ही योजना सभासदांच्या विशेष पसंतीस उतरत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सोनेतारण कर्ज, वाहन कर्ज, पिग्मी कर्ज व ओव्हरड्राफ्ट सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

या वर्धापन दिन सोहळ्यास परिसरातील अनेक प्रमुख संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये मारुती वरेकर, रामतीर्थ पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंपी, रामचंद्र मुरूकते, सचिन कोगेकर, विश्वास गाईंगडे, सन्मित्र पतसंस्थेचे मॅनेजर परशुराम गिलबिले, रवींद्र पाटील, महात्मा फुले पतसंस्थेचे मॅनेजर व चेअरमन अनुक्रमे शिवाजी गिलबिले, जवाहर नागरी पतसंस्थेचे मॅनेजर बाशीर काकतीकर, पंढरीनाथ पतसंस्थेचे मॅनेजर रफिक आगा, काशिनाथ अण्णा चराटी पतसंस्थेचे मॅनेजर शामराव पाटील, नगरसेवक अनिकेत चराटी आणि रवळनाथ हाउसिंगचे चेअरमन जनार्दन दळवी यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.