स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधील आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज - इंजि. प्रशांत हडकर

स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधील आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज - इंजि. प्रशांत हडकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डीकेटीई इचलकरंजीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनने इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (आयएसएसई) कोल्हापूर सेंटर, क्रेडाई इचलकरंजी आणि डीआरएक्स कॉंक्रिट (कोंडीग्रे) यांच्या सहकार्याने ६ ऑगस्ट २०२५ रोजी 'रिसेंट ट्रेंड्स इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग' या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले. या चर्चासत्रात प्रसिद्ध वक्ते, आयएसएसई कोल्हापूरचे सेंटरचे चेअरमन आणि आघाडीचे कन्सल्टिंग स्ट्रक्चरल इंजिनिअर  प्रशांत सुभाष हडकर यांनी मार्गदर्शन केले. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधील आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन इंजि. प्रशांत हडकर यांनी यावेळी केले. 

प्रशांत हडकर यांनी स्ट्रक्चरल एनालिसिस, प्रगत सॉफ्टवेअर टूल्स, आधुनिक स्ट्रक्चरल डिझाइन, नाविन्यपूर्ण बांधकाम पद्धती, अद्ययावत कोड आणि मानके तसेच रेट्रोफिटिंग आणि रिहॅबिलिटेशन तंत्रे यासारख्या प्रमुख विषयांवर एक अभ्यासपूर्ण सत्र दिले. याप्रसंगी त्यांनी भविष्यातील आयएसएसई व डीकेटीई इचलकरंजीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वाटचाली विषयी व नियोजित कार्यक्रमाविषयी माहिती दिली.

डीकेटीई सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशनच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या समन्वयन प्रा. (डॉ.) एम. बी. चौगुले, प्रा. जे. एस. रॉड्रिग्ज आणि प्रा. पी. ए. पिसे यांनी केले.

यावेळी विभागप्रमुख प्रा. ए. एल. मुल्ला, प्रा. (डॉ.) एस. के. पाटील,  रणधीर मोरे यांची उपस्थिती होती. डीकेटीईच्या संचालिका प्रा. (डॉ.) एल. एस. आडमुठे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वी झाला.