राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात दोन अंकी नाटकाचे आयोजन
कोल्हापूर (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याच्या शताब्दी महोत्सवानिमित्त, "संघ गंगा के तीन भगीरथ" या दोन अंकी नाटकाचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

या नाटकाचे आयोजन मराठा भवन ट्रस्ट आणि ट्रस्टचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना महेश जाधव म्हणाले, "संघाच्या शताब्दी वर्षात कोल्हापुरात अशा प्रकारचे नाटक सादर करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक गोष्ट आहे."
यावेळी बोलताना नाम. चंद्रकांत पाटील म्हणाले, "संघाची विचारधारा अजूनही अनेक ठिकाणी पोहोचलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्वयंसेवकाने ती घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. दलित, शोषित आणि पीडित समाजापर्यंतही ही विचारधारा पोहोचवून देशाला परमवैभवाकडे नेणे, हे आपले ध्येय असले पाहिजे."
कोल्हापूरकरांनी या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नाटकानंतर अनेक स्वयंसेवकांनी त्याचे आयोजन उत्तमपणे केल्याबद्दल पेंडसे दांपत्याचे विशेष आभार मानले.
तसेच, नाम. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नितीन वाडीकर, अजून जमादार यांच्यासह कार्यक्रमाला योगदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींना सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला आप्पासाहेब दड्डीकर, डॉ. सूर्यकिरण वाघ, प्रमोद ढोले, प्रफुल्ल जोशी, मुकुंद भावे, केदार जोशी, हेमंत आराध्य, संतोष दिवटे, सतीश अंबडेकर, विराट चिखलीकर, अमर साठे, गायत्री राऊत, रविकिरण गवळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.




