सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस, वजन साडेआठ किलोने घटले; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उद्या देशव्यापी आंदोलन

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १८ वा दिवस, वजन साडेआठ किलोने घटले; विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उद्या देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या २६ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. वांगचुक यांची खालावती प्रकृती आणि विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आताकॉकरोच जनता पार्टीसरसावली असून, पक्षाने उद्या, १६ जुलै रोजी देशव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक दिली आहे.

या संदर्भात ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर अधिकृत पोस्ट करत पक्षाने जाहीर केले आहे की, “उद्या, १६ जुलै रोजी सोनम वांगचुक आणि देशातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आमच्यासोबत या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हा.”

वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; साडेआठ किलो वजन घटले
 गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेल्या अन्नत्यागामुळे सोनम वांगचुक यांची प्रकृती कमालीची खालावली असून ती चिंताजनक बनली आहे. ‘कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती देताना सांगितले की, “सततच्या उपोषणाने वांगचुक यांच्या शरीरातील स्नायू झिजत असून त्यांना तीव्र वेदना होत आहेत. त्यांचे वजन तब्बल . किलोने कमी झाले असून, रक्तदाब (बीपी) १०९/७० पर्यंत खाली आला आहे.”

मला उपोषण मागे घेण्यास सांगू नका, सरकारला जाब विचारा!’
 वांगचुक यांच्या खालावत्या प्रकृतीमुळे अभिजीत दिपके यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, वांगचुक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दिपके यांच्या विनंतीला अत्यंत शांतपणे उत्तर देताना वांगचुक म्हणाले, “मला उपोषण मागे घेण्यास सांगू नका. उलट सरकारला विचारा की ते आंदोलक विद्यार्थ्यांशी आणि आमच्याशी चर्चा का करत नाहीयेत?”

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि NEET परीक्षेतील अन्यायाविरोधात सुरू असलेले हे आंदोलन आता सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीमुळे अधिक संवेदनशील वळणावर पोहोचले असून, उद्या होणाऱ्या देशव्यापी उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.