डॉ. धैर्यशील पवार यांना कायरोप्रॅक्टर ही आंतरराष्ट्रीय पदवी
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : येथील डॉ. धैर्यशील जयसिंग पवार यांना Webbic University of Ghana (USA) येथून Diploma in Chiropractic ही आंतरराष्ट्रीय पदवी प्रदान करण्यात आली. या पदवी प्रदान सोहळ्याचे आयोजन तामिळनाडू राज्यातील कोईमतूर येथे संपन्न झाले.

डॉ. पवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले कायरोप्रॅक्टर असून त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच सन 2023 मध्ये त्यांना Webbic University कडून Honorary Doctorate ही पदवी बहाल करण्यात आली आहे.
याशिवाय Quality Council of India (QCI) अंतर्गत Traditional Community Health Provider (TCHP) या उपक्रमातून त्यांना प्रमाणित पारंपारिक हाडवैद्य (Certified Traditional Bonesetter) म्हणून मान्यता मिळाली आहे.
डॉ. पवार हे सायटिका, सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस, फ्रोजन शोल्डर, मणक्यांचे विकार, चकती सरकणे,मरगळ येणे,स्पोर्ट्स इन्ज्युरी गुडघ्याचे विकार, नाभी सेटिंग, मायग्रेन, सायनस यांवर Chiropractic तंत्राने विना-औषध उपचार करतात. आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात तसेच ऑपरेशनपूर्व अवस्थेत योग्य वेळी उपचार घेतल्यास खात्रीशीर परिणाम मिळतात, असे त्यांनी सांगितले. गेल्या सहा वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत असून आतापर्यंत हजारो रुग्णांना उपचारांचा लाभ मिळाला आहे.
तसेच किडनी स्टोनवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येत असून आवश्यक आयुर्वेदिक औषधे स्वतः तयार करून दिली जातात.Dr. Bonecure Chiropractic & Bonesetting Center रंकाळा स्टँड कोल्हापूर येथे कार्यरत आहे.




