थंडीच्या कडाक्यात शिवाजी पुलावर घोड्यासोबत घडलं असं काही...

थंडीच्या कडाक्यात शिवाजी पुलावर घोड्यासोबत घडलं असं काही...

कोल्हापूर (प्रतिनिधी) - ग्रामीण भागांसह शहरात कडाक्याची थंडी वाढली असून, पहाटे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. मात्र निवाऱ्याविना राहणाऱ्या मुक्या प्राण्यांवर या थंडीचा अधिकच परिणाम होताना दिसत आहे. अशातच, आज पहाटेच्या सुमारास नवीन शिवाजी पुलावर एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.

पुलाच्या मध्यभागी असलेल्या दोन रस्त्यांच्या फटींमध्ये एका घोड्याचा पाय अडकला होता. थंडीने कापऱ्या झालेल्या या घोड्याची अवस्था पाहून रस्त्यावरून जाणारे नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यांनी पाय भेगेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पाय काही केल्या बाहेर येत नव्हता. नागरिकांनी तात्काळ अग्नीशमन दलाला या घटनेची माहिती दिली. दिलेल्या माहितीनुसार, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनीही प्रयत्न केले, तरीही घोड्याचा पाय भेगेतून सुटत नव्हता. 

या घटनेनंतर नागरिकांनी नवीन पुलावरील भेगा दुरुस्त करण्याची प्रशासनाकडे मागणी केली. सकाळी अनेकजण फिरण्यासाठी किंवा मुलं सायकल चालवण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. आज घोड्यासोबत घडलेली ही दुर्घटना उद्या कोणत्याही नागरिकाबाबत घडू नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.