बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून घमासान ; दिव्याच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह
Big Boss Marathi Updates - बिग बॉस मराठीचा सिझन ६ मध्ये पहिल्या आटवड्यापासून अनेक राडे पहायला मिळत आहेत. अशातच आता, कॅप्टन्सीच्या मुद्द्यावरून घरात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रत्येक सदस्य आपले स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना, कॅप्टनपदाच्या शर्यतीतून घरातील समीकरणे बदलताना दिसत आहेत. समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिव्याच्या कॅप्टन्सी क्षमतेवर घरातील सदस्यांनी थेट प्रश्न उपस्थित केल्याचे स्पष्ट होते. कॅप्टन्सीबाबत सुरू असलेल्या चर्चेत अनुश्रीने दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही, असा आरोप केला. तर रुचिताने, कॅप्टन असा असावा की ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे मत मांडले. यावेळी सुमित आणि सागर यांनीही दिव्याला लक्ष्य करत, दिव्या अजून मॅच्युअर नाही, अनुभवाच्या बाबतीत ती इतरांपेक्षा कमी पडते, असे म्हटले.

घरातील सदस्यांनी केलेल्या आरोपानंतर दिव्या शांत बसली नाही. तिने ठामपणे आपली बाजू मांडत, अनुभव जन्मतः कोणाकडेच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते, असे स्पष्ट केले. दिव्याच्या या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे घरातील वातावरण अधिक तापल्याचे दिसून येते.
https://www.instagram.com/reel/DTtzI7eiDP_/?utm_source=ig_web_copy_link
दिव्याचा हा करारी बाणा पाहता, येत्या काळात घरातील समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आता दिव्या आपली भूमिका घरच्यांना पटवून देण्यात यशस्वी ठरणार का, की कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. घराचा पुढचा कॅप्टन कोण होणार, हे बिग बॉस मराठी सीझन ६ च्या आगामी भागात स्पष्ट होणार आहे.




