मंत्री चंद्रकांत पाटलांचे जि. प.अध्यक्षा शिल्पा खोत यांना निधीबाबत आश्वासन

मंत्री चंद्रकांत पाटलांचे  जि. प.अध्यक्षा शिल्पा खोत यांना निधीबाबत आश्वासन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आधक्ष्या शिल्पा शशिकांत खोत यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आधक्ष्या  खोत  यांनी जिल्हा परिषदच्या विविध प्रश्नांबबत चर्चा केली त्याचबरोबर जिल्हा परिषदेला विकास कामाकरिता मोठ्या प्रमाणात  निधी उपलब्ध करून देण्याबाबत  मागणी करण्यात आली.

 यावेळी मंत्री पाटील यांनी जि. प. च्या विकास कामाबाबत निधी साठी मागणी पत्र देण्यात यावे आपण शासनाकडून मोठया प्रमाणात निधी देऊ असे आश्वासन आधक्ष्या खोत यांना दिले.यावेळी गोकुळचे चेअरमन  नाविद मुश्रीफ व सुनील चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.