राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेला 3 कोटी 86 लाखाचा नफा-अध्यक्ष रोहित बांदिवडेकर

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेला 3 कोटी 86 लाखाचा नफा-अध्यक्ष रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शतकोत्तर वाटचाल करीत असलेल्या राजर्षि शाहू गव्हर्मेंट सव्र्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेस सन 2025-2026 सालामध्ये रु.3 कोटी 86 लाख इतका विक्रमी ढोबळ नफा झाला असून, आर्थिक वर्षात एनपीए "0%" केला असलेची माहिती बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी दिली.

गतवर्षीचे तुलनेत बँकेचे ठेवींमध्ये रु. 27 कोटीने वाढ होवून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेच्या एकूण ठेवी रक्कम रु.254.56 कोटी इतक्या आहेत. बँकेने रक्कम रु.176.76 कोटी इतकी कर्जे वितरीत केलेली आहेत. आर्थिक वर्षात बँकेने रु.117 कोटींची गुंतवणूक केली असून बँकेचा व्यवसाय 431.32 कोटी रुपये इतका झाला आहे. तसेच सी.डी. रेशो 69.44% इतका आहे.

बँकेने थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवलेने कर्जाची थकबाकी पूर्ण आटोक्यात आणून सलग सोळा वर्षे एनपीए "0%" (शून्य टक्के) राखणेत सातत्य ठेवलेले आहे. याकामी बँकेचे ज्येष्ठ संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील (एम.एस्.) व शशिकांत तिवले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले असलेचे बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण करुन बँकेने जनमानसात विश्वासार्हता जपलेली आहे. बँकेने राज्यस्तरीय विविध पुरस्कार मिळविलेले असून बँकेला रिझर्व्ह बँकेचे ग्रेड I मानांकन प्राप्त असलेचे सांगितले,

बँकेचे अध्यक्ष बांदिवडेकर यांनी बँकेच्या प्रगतीमध्ये बँकेचे सभासद सर्व संचालकांचे, ठेवीदार - ग्राहक, हितचिंतक व कर्मचारी वृंद यांचा सिंहाचा वाटा असलेने बँकेच्या नावलौकिकात वाढ झालेचे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सदानंद घाटगे, संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील (एम.एस.), शशिकांत तिवले, अतुल जाधव, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दिपक पाटील, गणपत भालकर, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे हे उपस्थित होते. यावेळी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले असलेचे त्यानी सांगितले.