शरद पॉलिटेक्निकचा महाराष्ट्रात उच्चांकी निकाल
यड्राव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या २०२५ च्या हिवाळी परिक्षेमध्ये यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निकने उच्चांकी यश मिळविले आहे. यामध्ये विशेष प्राविण्य व प्रथण श्रेणीत १९०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजमधील २५५० विद्यार्थी परिक्षा दिली होती. त्यासर्वांची सरासरी गुण ७५ टक्केपेक्षा अधिक आहे. तर ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणारे ५६ विद्यार्थी आहेत. तसेच महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी विविध विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून ‘शरद पॅटर्न’ने परत एक नवा उच्चांक निर्माण केला आहे.

महाविद्यालयातील तृतीय वर्षातील कॉम्प्युटर धर्मराज उपाध्ये, श्रावणी सारवी, खुशबू बारस्कर, प्रियांका वंजीरे, सारा पटेल, शुभम सुतार, स्नेहल टकले इलेक्टॉनिक्स कॉम्प्युटरमधील श्रावणी लांडे, सोनाली मोरे, अनुष्का मांजरे, श्रध्दा मुत्तुर आर्टीफिशियल इंटेलिजेन्स स्नेहा पाटील, पूजा माळी, श्रध्दा सुतार, नम्रता कचरे, अंजली चौगुले, मंजुश्री पाटील, समिक्षा पाटील, रेहान मोमिन, मयुरेश पाटील, साक्षी माने, वल्लभ देवळे, पूर्वा भेंडवले इलेक्ट्रीकलमधील रोहित माने, भाग्यश्री राजमाने, मलिक अत्तार, सबिया कुरणे, कॉम्प्युटर आयटीमधील सार्थक बुचडे, विश्वजीत खोपकर, यश देसाई, तनिष्का सावंत, ऐश्वर्या विभुते अॅटोमेशन रोबोटीक्समधील ऋतुजा डोंगरे या विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
व्दितीय वर्षातील कॉम्प्युटर श्रावणी दमते, समृध्दी कोले, सोनाक्षी कांबळे, श्रीदेवी पाटील, कृष्णा चव्हाण इलेक्टॉनिक्स कॉम्प्युटरमधील धृती मिठारी, श्रावणी खंडाळे आर्टीफिशियल इंटेलिजेन्समधील सिध्दीविनायक खरबुडे, दिक्षा कदम, स्नेहा चौधरी, कॉम्प्युटर आयटीमधील साक्षी कल्ले, आयान मुल्ला, शगुफ्ता चिकोडे, आश्लेषा मुधाळे, अमृता भानुसे, अॅटोमेशन रोबोटीक्समधील राहुल गतारे ह्या विद्यार्थ्यानी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत.
प्रथम वर्षातील सोनम माळी, सादिया मोमिन, फलकजहान खान, सायली पाटील, तिर्था पारेख, स्तुती सिदनाळे, सिमरन मुल्ला यांनी ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले. परिक्षेमध्ये विविध विषयात स्नेहा चौधरी, साक्षी कल्ले, जुबेर आपराध, अमृता भनसे, रिया सयीम, अमृता भोसले, श्रावणी दमते, सोनाक्षी कांबळे, सानिका पाटील, आयुष कोळी, समृध्दी कोले, अनुष्का देसाई, सोनिया पाटील, इशान मोळेकर, फलकजहान खान, सिफा नदाफ या १६ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संथेचे अध्यक्ष आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य बी. एस. ताशीलदार, सर्व डिन, विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.




