२०० दिव्यांग बांधवांना निधी व साहित्य वाटप आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले

२०० दिव्यांग बांधवांना निधी व साहित्य वाटप आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार

कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२२ - २३ या वर्षीच्या ५ टक्के निधीतून प्रति लाभार्थी २ हजार रुपये प्रमाणे २०० लाभार्थ्यांना ४ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला.त्याचप्रमाणे १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ४ लाख ५४ हजार रुपयांचे दिव्यांगाना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

कोडोली गावासह परिसरातील दिव्यांग बांधवासाठी एक सांस्कृतिक हॉल बांधण्याची मागणी निर्माण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयदिप पाटील यांनी केली.या वर्षीच्या आमदार निधीतून दिव्यांग बांधवांसाठी कोडोली येथे सुसज्य सांस्कृतिक हॉल मंजूर करणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील,जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील,सुरेश पाटील,वारणा बॅकेचे संचालक प्रमोद कोरे,डॉ.प्रशांत जमने,वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे,कोडोली गावच्या सरपंच भारती पाटील,उपसरपंच प्रविण जाधव,माजी सरपंच नितीन कापरे,रणजित पाटील,माजी उपसरपंच निखिल पाटील,माणिक मोरे,ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील,प्रकाश हराळे,अविनाश महापुरे,राजू दाभाडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे तसेच ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण - पाटील यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.