अभिनेत्री दीपिका पादुकोण 'कल्की 2898 एडी' च्या सिक्वेलमधून बाहेर ; नेमकं कारण काय..?
मुंबई - अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. बहुचर्चित 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दीपिका दिसणार नाही. निर्माते विजयंती मुव्हीज यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही घोषणा केली.

पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले की, "दीपिका पादुकोण आता #Kalki2898AD च्या आगामी सिक्वेलचा भाग नसेल. काळजीपूर्वक विचारांती, आम्ही वेगळी वाट धरत आहोत. पहिल्या चित्रपटातील सहकार्य जरी संस्मरणीय असले तरी पुढील प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वचनबद्धता जुळून आली नाही."
या निर्णयामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणचे चाहते नाराज झाले असून, पहिल्या भागातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. पोस्टमध्ये अभिनेत्री दीपिकाला टॅग करत तिला भविष्यातील कामांसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.




