आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा २५ जून रोजी होणार सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून रोजी सकाळी ११:३० वाजता छत्रपती शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
देशात सन १९७५ ते १९७७ मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या व्यक्तींना सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. जिल्ह्यातील या व्यक्तींचा बुधवार २५ जून रोजी सकाळी ११:०० वाजता छत्रपती शाहूजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर, येथे सन्मान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यास कारावास भोगलेले व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
आणीबाणीतील गौरवमुर्तींचे चित्रप्रदर्शन -
या विषयावर ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आणीबाणीत कारावास भोगलेल्या गौरवमुर्तींवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा माहितीकार्यालयाच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनाचाही लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.