कोगे येथील श्री दत्त मंदिरात विविध उपक्रमांनी उत्सव संपन्न

करवीर (विश्वनाथ मोरे) - कोगे तालुका करवीर येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 61 वा जन्माष्टमी दीपोत्सव व 33 वा दत्त मूर्ती वर्धापन दिन उत्सव अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
15 ऑगस्ट रोजी पंत महाराजांच्या प्रेम ध्वजारोहण कार्यक्रम होऊन या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर अखंड नामस्मरण करीत पहिल्या दिवशीचे आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले. 16 ऑगस्ट दुपारी 3.00 वाजता श्री पंत महाराज यांचा जन्मकाळ संपन्न झाला. त्यानंतर भजन सेवा करीत दुसऱ्या दिवशीचे आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तर तिसरा दिवस 17 ऑगस्ट रोजी श्री दत्ताच्या मूर्ती अभिषेक करून सकाळी 9.30 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सांगली, सातारा, कोल्हापूर, गडहिंग्लज आदी भागातून जवळपास 50 भजनी मंडळाचा समावेश होता.
सदर पालखी मुख्य पालखी मार्गावरून महादेव मंदिर पासून दुपारी 3.30 मिनिटांनी पालखी दत्तमंदिरात आली.यामध्ये हलगीच्या तालावर नाचणारा घोडा,धनगरी ढोल,बॅन्जो,मर्दानी खेळ,धुंदवडे गावचे मुलींचे लेझीम पथक अशा विविध वाद्यांनी संपूर्ण कोगे परिसर भक्तीमय झाला होता.
करवीर पश्चिम भागातील मिनी बाळेकुंद्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोगे गावांमध्ये संपन्न झालेल्या या पालखी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर नतमस्तक झाले.
यामध्ये आमदार चंद्रदीप नरके, माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सुर्यवंशी, गोकुळ दूध संघाचे संचालक व कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, प्रमुख पाहुणे भिलवडेचे संतानन महाराज, आकाराम पोवार, डॉ. संजयपंत बाळेकुंद्रीकर (अकोल ), प्रसाद दिवेकर, गडहिग्लजचे दताअण्णा बरगे, आकाराम महाराज करपेवाडी, गुरुवर्य दत्तात्रय झेमसे , जेष्ठ गुरुबंधू व मार्गदर्शक गोविंद मोरे , श्री पंत सांप्रदाय मंडळाचे सर्व सदस्य , गुरुबंधू, भगिनी आदी मान्यवर , पंचक्रोशीतील हजारो भक्त भाविक, कोगे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , सर्व सदस्य, तसेच कोगे गावातील सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.