आपत्ती व्यवस्थापन जनजागृती साठी मिनी मॅरेथॉन चे आयोजन

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती साठी मिनी मॅरेथॉन चे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधि) : राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांचे मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापना विषयीची जनजागृती करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 07.00 वाजता मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मिनी मॅरेथॉनचा रन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून सकाळी 07.00 वाजता सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापासून धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकापर्यंत जाऊन परत जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीचा साधारणपणे 2.5 किलोमीटर अंतराचा असणार आहे. 

या मिनी मॅरेथॉन मध्ये कोल्हापूर शहरातील एनसीसी, एनएसएस मध्ये कार्यरत असणारे महाविद्यालयीन युवक युवती यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विषयात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवकही या जनजागृतीपर मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी युवक युवतींनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 6.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये जमावे असे आवाहन करण्यात येत आहे.