उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांचा ‘राज्यस्तरीय सरपंच’ पुरस्काराने सन्मान

उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांचा ‘राज्यस्तरीय सरपंच’ पुरस्काराने सन्मान

उचगाव (प्रतिनिधी): अहिल्यानगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सरपंच पुरस्कार  सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उचगाव गावचे लोकनियुक्त सरपंच पैलवान मधुकर चव्हाण यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात पैलवान मधुकर चव्हाण यांनी गावासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली.

      हा पुरस्कार उज्जैन (महाकाल) येथील मंहत डॉ. श्रीकांत दास धुमाळ महाराज, सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे तसेच हवामान तज्ञ पंजाबराव डंख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास उचगांव मधील उपसरपंच संदीप पाटील बाळासाहेब यादव,मधुकर चव्हाण, रमेश वाईंगडे, सदिप कुभार, राहूल मोळे,गुरूदेव माने, पृथ्वीराज चव्हाण, विराग करी,तुषार पाटील, सुमित मोरे, श्रीधर कदम, सुरज पाटील, विनायक हावळ, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच मधुकर चव्हाण यांना मिळालेल्या पुरस्काराने उचगाव पंचक्रोशीत सर्वत्र त्यांच कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.