'या' सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व कोल्हापूरकरांचे अभिनंदन - आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) - माधुरी हत्तीणी परत यावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून नांदणीसह सर्व कोल्हापूरकर, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते. माधुरी हत्तीणीच्या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून परत येण्याचा निर्णय हा कोल्हापूरातील लोकांच्या एकजूटीचा आणि लोकभावनेचा असल्याचं मत यावेळी विधान परिषदेचे गटनेते आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
आ. सतेज पाटील पुढे म्हणाले, या सामुहीक लढ्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. माधुरीला कोल्हापुरात पुनर्वसन करण्याचा वनतारा व्यवस्थापनेच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो.