एचएसआरपी (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदतवाढ

एचएसआरपी (HSRP) बसविण्यास 15 ऑगस्ट पर्यंत अंतिम मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शासनाकडून 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी एचएसआरपी (HSRP) 31 मार्च पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आता 15 ऑगस्टपर्यंत वाहनांना नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

आजपर्यंत जुन्या वाहनांना HSRP बसविण्याचे कामकाज फारच कमी प्रमाणात पुर्ण झाल्याने सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्यासाठी 15 ऑगस्ट  पर्यंत नव्याने अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली आहे.