कळंबा तलाव ओव्हरफ्लो ; ग्रामपंचायत - महापालिका प्रशासनाकडून दक्षता

कळंबा तलाव ओव्हरफ्लो ; ग्रामपंचायत - महापालिका प्रशासनाकडून दक्षता

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रात आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. आज कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्यात जाऊ नये तसेच हुडलबाजी करू नये. असे आवाहन ग्रामपंचायत, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. याबाबत योग्य ती दक्षता तसेच बंदोबस्त करावा यासाठी कळंबा तलाव संरक्षण व संवर्धन आंदोलन यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासन यंत्रणे कडून या ठिकाणी दक्षता म्हणून बॅरिकेट्स लावण्यात आली आहेत.

यावेळी निमंत्रक प्रकाश टोपकर, अध्यक्ष संग्राम जाधव, सुहास निकम ,राज नरके, विश्वजीत बगाडे, रोहित निकम , योगेश तिवले, प्रकाश पोवार, तानाजी भवड आदींनी प्रशासनाला निवेदन दिले. प्रशासनाकडून तलाठी,पोलीस, उपसरपंच आदी उपस्थित होते.