कोल्हापूर युवा सेनेच्या वतीने आई अंबाबाईच्या मंदिरात ५९ किलोचा भव्य लाडू अर्पण

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील युवा सेनेने, चक्क ५९ किलोचा मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या मंदिरात अर्पण केला आहे. या भल्या मोठ्या लाडूला पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळाली.हा लाडू मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूल गेट जवळ भाविकांना पाहण्यासाठी ठेवला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक मंत्र पठण, व सांगता देवीच्या आरतीने संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे युवा सेनेचे विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांची उपस्थिती होती. यावेळी विजय देवणे, युवा सेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन कोल्हापूर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमाला सुरुवात सकाळी साडेअकरा वाजता झाली.
यावेळी युवासेना विभागीय सचिव अविनाश बालकवडे,शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले,सुनील शिंत्रे,युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे,विराज पाटील, राजू यादव, युवासेनेचे स्वप्नील मगदूम, शुभम पाटील, अक्षय मोरे, शुभम पाटील, सुमित मेळवंकी, ओंकार मंडलिक,अवधूत साळोखे, कृष्णा जाधव, चैतन्य देशपांडे,किर्ती जाधव, बंडा लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.