डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार यश; कृषी क्षेत्रातील अभिनव उपायासाठी बेस्ट सोल्यूशन अवॉर्ड

डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार यश; कृषी क्षेत्रातील अभिनव उपायासाठी बेस्ट सोल्यूशन अवॉर्ड

इचलकरंजी (प्रतिनिधी) : डीकेटीईच्या इटीसी विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या बुध्दीमता, सर्जनशीलता आणि तांत्रिक प्राविण्याचा प्रभावी ठसा उमटवत उल्लेखन्नीय यश संपादन केले आहे. इन्व्होवेट यु टेकथॉन ३.० २०२६ या प्रतिष्ठीत राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी बेस्ट सोल्यूएशन अ‍ॅवार्ड (अ‍ॅग्रीक्ल्चर डोमेन) हा मानाचा पुरस्कार पटकावत संस्थेच्या लौकिकात भर घातली आहे.

पुणे येथील एआयएसएसएमएस इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत देशभरातील नामांकित १५० हून अधिक अभियांत्रिकी संस्थातील ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा उर्त्स्फुत सहभाग होता. या स्पर्धेची खास वैशिष्टये म्हणजे, पारंपारिक चौकटी बाहेर जावून फ्रीहँण्ड पध्दतीने वास्तव जीवनातील समस्यांची ओळख करुन त्यावर नाविन्यपूर्ण व तांत्रिकदृष्टया सक्षम उपाय सुचविण्याचे आव्हान सहभागीसमोर ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना उद्योजकता विकसीत करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरुप देणे हा या स्पर्धेचा मुख्य उददेश होता

कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष समस्यांचा सूक्ष्म अभ्यास करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी, व्यवहार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित समाधान विकसित केले. समस्याचे अचूक विश्‍लेषण, नाविण्यपूर्ण दृष्टीकोन तसेच तांत्रिक आंमलबजावणीतील उत्कृष्टता यांमुळे त्यांच्या प्रकल्पाने परिक्षकांना विषेश प्रभावित केले आणि त्यांना सर्वोच्च मानांकन मिळवून दिले.

या स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींगमधील विभागातील विद्यार्थी कार्तिक कोडग, आशुतोष भडगावे, विघ्नेश पाटील आणि हर्षदा शेरेकर यांचा समावेश असून, त्यांनी डॉ. दिपाली ढंग यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विकसीत केला असून या प्रकल्पासाठी रुपये १० हजारचे रोख पारितोषीक देवून गौरविण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने कृषी क्षेत्रात सकारात्मक व परिमाणकारक बदल घडवून आणण्याची क्षमता डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी दाखवत विद्यार्थ्यांनी दर्जेदार कल्पकतेचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. सदर स्पर्धेमध्ये तीन फे-या होत्या. प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणा-या तांत्रिक प्रश्‍नांना डीकेटीईचे विद्यार्थी गुणवत्ता सिध्द करीत होते यामध्ये बौध्दीक, तांत्रिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जनरल नॉलेज व मुल्यांकन या सर्व स्तरावर डीकेटीईचे विद्यार्थी पात्र ठरुन त्यांना गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस.आडमुठे, इटीसी विभागप्रमुख डॉ.सौ.जे.पी.खरात यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.