संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी): 19 एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंती निमित्त संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 17 एप्रिलला शिवमूर्ती आगमनाने उत्सवाची सुरुवात होणार असून दुपारी मोटरसायकल रॅली निघणार आहे . शनिवारी 18 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता शिवाजी महाराज व गोवा या विषयावर नामदार सुभाष फळदेसाई यांचे व्याख्यान होणार आहे, तसेच कोल्हापूर महापालिकेच्या महापौर ,उपमहापौर,  पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत  संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार होणार आहे.

रविवारी 19 एप्रिलला सकाळी 10 वाजता समितीच्या महिला सदस्यांच्या वतीने शिवजन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे, तसेच सायंकाळी 6 वाजता आभास कला अकॅडमी कोल्हापूर प्रस्तुत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या धगधगत्या जीवनावर आधारित शिवपुत्र शंभूराजे हे महानाट्य सादर होणार आहे, यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, नामदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक शारंगधर देशमुख, सत्यजित कदम, हर्षल सुर्वे यांची उपस्थिती असणार आहे.