नाना पटोले यांच्या आईचे निधन

नाना पटोले यांच्या आईचे निधन

भंडारा : महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 मीराबाई पटोले यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनामुळे पटोले कुटुंबियांना आधार देण्यासाठी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सुकळी येथे उपस्थित होते.