बांधकाम कामगारांना 'संसार सेट' चे लवकरात लवकर वाटप करा : राष्ट्रवादी असंघटित विभागाची मागणी

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यान मंडळाकडून बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संसार सेटचे वाटप 6 ते 7 महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना या 'संसार सेट'चे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या असंघटित विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळ आयुक्त यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ही योजना ही फक्त दोन वर्षासाठी मर्यादीत असल्याचे समजते. अशातच बांधकाम कामगारांमध्ये संभ्रम अवस्थेचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ऍक्टिव्ह बांधकाम कामगारांची नोंदणी संख्या लक्षात घेता त्यातील बऱ्याच नोंदीत बांधकाम कामगारांना संसार सेट मिळाले नाहीत.अशा बांधकाम कामगारांना त्वरित संसार सेटचे वाटप करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभाग (अजित पवार) गटाच्या वतीने आदिल फरास यांच्या नेतृत्वात कामगार आयुक्त कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी या निवेदनातून देण्यात आलाय.
यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे अध्यक्ष नितीन मस्के, कुणाल गंगाधरे, प्रदिप भोसले,निसार बहाद्दूर शेख, आदित्य मळकर, सुरेश गवळी,संदीप साळोखे, अमित अतीग्रे, सौरभ खाडे,विकास चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.