मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराची सुरुवात नचिकेत भुर्के यांनी रक्तदान करुन केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप उद्योग आघाडी, महाराष्ट्र प्रदेश व लक्ष्मीपुरी मंडल, कोल्हापूर मार्फत आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
यामध्ये 80 रक्तदान बाटली व मोफत दंत व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ 125 जणांनी घेतला. यावेळी 50 पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेल्या रक्तवीरांना उद्योग आघाडी मार्फत सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विशाल शिराळकर, आप्पा लाड, अतुल चव्हाण, रश्मी साळोखे, जर्नादन पोवार, सुजीत मोरे, प्रसाद नरुले, योगेश कांगटाणी, सुनील पाटील, विवेक कोरडे, संभाजी शिंदे, जनार्दन पोवार, धनश्री तोडकर, अवधूत भाटे, ओंकार रेणके, संतोष माळी, अरविंद वडगावकर, गणेश चिले, वीरेंद्र मोहिते, सुरेश गुजर यांच्यासह आदी उपस्थित होते.