मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूर तर्फे विविध उपक्रमांनी साजरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मनसे कोल्हापूर तर्फे विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सालाबाद प्रमाणे सलग ७ व्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम घेण्यात आले. 

आज रोजी पहाटेच्या सुमारास करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी चरणी अभिषेक घालून राज ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर शहर -जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नारीशक्तीच्या सन्मानार्थ विद्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील हे होते. 

जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक आपुलकीचा अनोखा उपक्रम म्हणजे वैद्यकीय कामी अत्यंत आवश्यक असणारी उपकरणे यामध्ये सक्शन मशीन, औषध ट्रॉली व फूट स्टेप स्टूल व अन्य उपकरणे पंचगंगा हॉस्पिटल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय , कोल्हापूर (CPR) आदी रुग्णालयांना रुग्णसेवेसाठी आवश्यक उपकरणे प्रदान करून राज ठाकरे यांचा वाढदिवस  अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या थाटात संपन्न झाला.

यावेळी हातकणंगले जिल्हाध्यक्ष दौलत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, राजू पाटील, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील,जिल्हा सचिव निलेश आजगावकर, शहर सचिव यतीन होरणे, विजय करजगार, तालुका उपाध्यक्ष संजय चौगुले, अरविंद कांबळे, राहुल खाडे, राहुल पाटील, गणेश तेरवाडे, अमर कंदले, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, सुनील तुपे, उत्तम वंदुरे, चंद्रकांत सुगते, मोहसीन मुल्लानी, अभिजीत संकपाळ, रणजीत वरेकर, विभाग अध्यक्ष सागर साळोखे, निलेश पाटील, राहुल पाटील, रोहित आवळे, निलेश पाटील, नवनाथ निकम, अमित बंगे, गणेश लाखे, प्रशांत माळी, हेमंत जानवेकर , सुधीर कोठावळे , ॲड. श्रेया घोरपडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.