माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवारांनी भरला अर्ज ; शरद पवार काय म्हणाले..?

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवारांनी भरला अर्ज ; शरद पवार काय म्हणाले..?

बारामती - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यामुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, "ही निवडणूक स्थानिक स्वरूपाची आहे. राज्याच्या पातळीवर याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. ही फक्त त्या परिसरापुरती मर्यादित आहे, आजूबाजूच्या तालुक्यांचेही याकडे फारसे लक्ष नाही." त्यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत कोणतीही टोकाची भूमिका घेण्याची गरज नसल्याचे पक्षाचे धोरण आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, "एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली. जर लोकांना विश्वासात घेतले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. आता १९,००० सभासदांचा प्रश्न निर्माण झाला आहे." याचा अर्थ, समन्वय साधला गेला असता, तर अडचणी टाळता आल्या असत्या. "एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता, पण आता कापसाचे उत्पादन तिथे थांबले आहे. त्यामुळे सूतगिरणी उभी राहू शकली नाही."

महाराष्ट्र सरकारने शेती व ऊस आधारित उद्योगांसाठी घेतलेल्या निर्णयाचे पवारांनी स्वागत केले. त्यांनी सांगितले, "राज्य सरकारने ५०० कोटींचा निर्णय घेतला आहे. ऊस आणि इतर पिकांचा वापर कसा करायचा, यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा ठरेल असंही शरद पवार म्हणाले. 

तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना म्हटले, "फडणवीस यांनी धाडसाने निर्णय घेतला. एआय वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरत आहे. त्यामुळे मी सरकारचे अभिनंदन करतो असंही पवार म्हणाले.