संभाजीनगरात मोठा ट्विस्ट...
संभाजीनगर (प्रतिनिधी) : राज्यातील 5 जिल्हापरिषदांमध्ये आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. सोलापूर, संभाजीनगर, परभणी, सांगली आणि सातारा या जिल्हा परिषदांमध्ये आज (18 मार्च) अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होईल.याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या सदस्यांनी कुणालाही मतदान करू नये, तटस्थ राहावे, असं व्हीप शिवसेना ठाकरे गटाकडून काढण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून तटस्थ राहण्याच्या सूचना दिल्यामुळे याचा थेट भाजपला फायदा होणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला याचा फटका बसेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेची चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकी आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन सदस्य गायब असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही सदस्य भाजपच्या गोटात गेल्याचं सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषद सदस्य संजय निकम आणि ललिता सोनवणे भाजपच्या गोटात गेल्याची माहिती आहे.




