राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेतर्फे आयोजित कार्यक्रम तूर्तास स्थगित - रोहित बांदिवडेकर

राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँकेतर्फे आयोजित कार्यक्रम तूर्तास स्थगित - रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  राजर्षि शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस् को - ऑप बँकेमार्फत सभासदांच्या मुलींसाठी रविवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम काही कारणात्सव स्थगित करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर यांनी दिली आहे. 

रविवार 17 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उदघाटन कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश, खंडपीठाचे न्यायमुर्ती, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर अति महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच पार्किंगकरीता दसरा चौक येथील ग्राऊंड पार्किंगकरीता आरक्षित केले आहे.

बँकेचे अध्यक्ष रोहित रोहिणी प्रकाश बांदिवडेकर कार्यक्रम स्थगित केल्याबाबत पुढे म्हणाले, आमच्या बँकेने आयोजित केलेल्या पद्माराजे पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासद सत्कार समारंभ कार्यक्रमाला बँकेचे सभासद हे जिल्ह्याचे विविध भागातून व इतर जिल्ह्यातून येणार असल्याने त्यांची होणारी गैरसोय विचारात घेवून बँकेने रविवार 17 ऑगस्ट रोजी आयोजित केलेला पद्माराजे पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासद सत्कार कार्यक्रम तूर्तास स्थगित केला आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख निश्चित होताच कळवित आहोत याची सर्व सभासद, पालक, विद्यार्थी, ठेवीदार व हितचिंतक यांनी नोंद घ्यावी असही ते म्हणाले.