शरद इन्स्टिट्युटच्या ७ विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड

शरद इन्स्टिट्युटच्या ७ विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा कंपनीत निवड

यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ७ विद्यार्थ्यांची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स, आर्टिफिशीय इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स, मेकॅट्रॉनिक्स या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली. 

ऑटोमेशन अॅण्ड रोबोटीक्स विभागातील प्राची उपलाने, दिक्षा कांबळे, दिव्या सुतार, तेजस निमळे, आर्टिफिशीय इंटेलिजेन्स विभागातील मधूरा भाट, ऋतुराज माणकापुरे, मेकॅट्रॉनिक्स विभागातील कोमल दमटे या विद्यार्थ्यांची निवड झाली.  

ही महिंद्रा समूहाचा एक भाग आहे आणि आयटी सेवा, सल्लागार, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कन्सल्टिंग आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंगसह विस्तृत सेवा देणारी एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. यामध्ये एआय, क्लाउड, अभियांत्रिकी, व्यवसाय प्रक्रिया सेवा आणि दूरसंचार उपाय यांचा समावेश आहे. पुण्यात मुख्यालय असून जगभरातील ८० देशापेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. मार्च २०२६ पर्यंत सुमारे १.४० लाख कर्मचारी कार्यरत आहेत. टेलिकॉमवरून बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) कडे लक्ष केंद्रित करत आहेत.

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. प्रोजेक्ट बेस लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुस-या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो. तसेच तृतीय वर्षापासूनच अॅप्टीट्युड ट्रेनिंग, कोडींग लँग्वेज स्कील, माजी विद्यार्थांकडून मार्गदर्शन घेतले जाते. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.