शरद इन्स्टिट्युटमध्ये २५ व २६ एप्रिलला आंतरराष्ट्रीय परिषद

शरद इन्स्टिट्युटमध्ये २५ व २६ एप्रिलला आंतरराष्ट्रीय परिषद

यड्राव - यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘ग्रीनएआय नेक्सस २०२५’ हि आंतरराष्ट्रीय परिषद (कॉन्फरन्स) शुक्रवार (ता.२५) व शनिवार (ता.२६) रोजी होणार आहे. यामध्ये ‘कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा पर्यावरण, ऊर्जा आणि पृथ्वीच्या संवर्धनासाठी वापर’ या विषयावर हि परिषद होणार आहे. अध्यक्षस्थानी चितकारा विद्यापिठाचे प्र-कुलगुरु (संशोधन) डॉ. सौरव दीक्षित आहेत. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

परिषदेमध्ये तज्ञांचे शोधनिबंध ‘मॅथेमॅटीक्स इन इंजिनिअरिंग, सायन्स अँड एअरोस्पेस जर्नल’, ‘⁠⁠अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल अँड अ‍ॅस्ट्रोफिजिकल ट्रान्झॅक्शन्स: जर्नल ऑफ द युरेशियन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’, ‘⁠⁠ग्रीनएआय नेक्सस २०२५-बेंथम सायन्स पब्लिशर्स प्रोसिडिंग’, ‘टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट इन कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन: अॅन इंटरनॅशनल जर्नल’, ‘⁠⁠जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल नॅनोटेक्नॉलॉजी’, ‘एआय फॉर एन्व्हायर्नमेंटल मॉनिटरिंग, कन्सर्वेशन, अँड पॉलिसी फॉर संस्टेंबल डेव्हलपमेंट इन द WSEAS ट्रॅजेंक्शन ऑन एन्व्हायर्नमेंटल अँड डेव्हलपमेंट’ या स्कोपस इंडेक्स असलेल्या जर्नल्समध्ये प्रसिध्द होणार आहेत. 

या परिषदेमध्ये स्टेट मायनिंग युनिव्हर्सिटी-रशियाचे दिमित्री ए. राडोशिन्स्की, सेंट-पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ एरोस्पेस इन्स्ट्रुमेंटेशन-रशियाचे इगोर वि. मेटालेनोक, युनिव्हर्सिटी ऑफ एरोस्पेस अँड इन्स्ट्रुमेंटेशन-रशियाचे किरिल एपिफँटसेव्ह हे उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. उत्तरांचल विद्यापीठाचे धरम बुद्धी, नोएडाच्या अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीच्या प्रियांका सिंग, सीएमआर विद्यापीठचे रजत गेरा, आयआयटी जोधपूरचे भिवराज सुथार, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी रमणदीप सिंग हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. 

परिषदेत उदघाटन, परिषद पूर्व कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, ऑनलाईन सेशन, संशोधन पेपर सादरीकरण आदी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत.