शरद पॉलिटेक्ऩिक विद्यार्थ्यांची क्रिडा स्पर्धेत यश
यड्राव (प्रतिनिधी) : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकनेच्या विद्यार्थ्यांनी आंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस स्पोटर्स असोसिएशनच्या विभागीय विविध क्रीडा स्पर्धेत यश मिळविले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात मुलींनी बाजी मारत लांब व तिहेरी उडीमध्ये दृष्टी वर्दे, गोळा फेकमध्ये रेणुका कुंब्रालकर ह्या विजेत्या ठरल्या. तर समृध्दी हजारी (भालाफेक), अनुष्का मगदूम (तिहेरी उडी) यामध्ये उपविजेत्या ठरल्या.

मुलींनी सांघिक खेळामध्ये बुध्दीबळ उपविजेत्या ठरल्या. यामध्ये पल्लवी बडवे, श्रध्दा सुतार, श्रावणी काटकर, स्नेहल टकले, श्रुती पाटील सहभागी होत्या. तसेच रजा हमिद याने भालाफेक स्पर्धेत विजेता, पारस भेंडवडे हा वेटलिफ्टींग स्पर्धेत विजेता तर लोकेश निकम हा उंचउडी स्पर्धेत उपविजेता ठरला आहे. स्पर्धा गारगोटी येथे पार पडल्या.
संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रा. सुयोग दानोळे, प्रा. एस.एस. चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.




