श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याच्या मागणीवर हिंदुत्वनिष्ठ ठाम !

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याच्या मागणीवर हिंदुत्वनिष्ठ ठाम !

कोल्हापूर (प्रतिनिधी) - श्री गणेशविसर्जनाच्या संदर्भात प्रशासन जरी विविध शासन आदेश, तसेच न्यायालयाचे आदेश पुढे करत असले, तरी भाविकांनी विसर्जन करू नये यांसाठी पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेटस्’ घालावे असा आदेश कुठेही दिलेला नाही. वर्षभर विविध मार्गांनी होणार्‍या प्रदुषणाकडे डोळेझाक करते आणि केवळ गणेशोत्सवातच जागे होते. नदीत विसर्जन हा हिंदूंचा धार्मिक अधिकार असल्याने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याच्या मागणीवर हिंदुत्वनिष्ठ ठाम आहेत, अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनासमवेत बोलावलेल्या बैठकीत मांडली. बैठकी संदर्भात महापालिका प्रशासनाने हिंदु जनजागृती समितीला लेखी पत्र दिले होते. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी उपायुक्त शिल्पा दरेकर, तसेच प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी उदय भोसले म्हणाले, ‘‘वर्षभर नाले, साखर कारखाने यांसह अनेक मार्गाने प्रदूषण होत असतांना महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ कुठे असते ? महापालिका प्रशासन प्रशासनानेच नेहमी ‘आमचे प्रयत्न चालू आहेत’, असे ठोकळेबाज उत्तर असते. वर्षभर नदी प्रदषित होत असतांना पुरोगामी कुठे असतात ? गणेशक् त, नागरिक नदीत विसर्जन करण्यास ठाम आहेत.’’

संभाजी साळुंखे (बंडा) म्हणाले, ‘‘श्रीगणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण वाढते असा कुठला अहवाल प्रशासनाकडे आहे का ? वर्षातून एकदा येणार्‍या गणेशविसर्जनाच्या वेळीच प्रशासन का  आडकाठी निर्माण करते ? गेली दोन वर्षे जनता भाविक पंचगंगा नदीतच विसर्जन करत असून ते यंदाही नदीतच विसर्जन करतील.’’

दीपक देसाई म्हणाले, ‘‘प्रशासन भाविकांचा धार्मिक अधिकार हिरावून घेऊन बळजोरीने नदीवर बळजोरीने बॅरेकेटींग लावते; मात्र गणेशभक्तांचा उद्रेक होत असून त्यांनी दोन्ही वर्षे बॅरिकेटस तोडून विसर्जन केले. ते असा का करतात ? याचा अभ्यास प्रशासनाने केला आहे का ? उलट बॅरिकेटस लावण्यासारखी कृती करून प्रशासन कोल्हापूर अशांत करत आहे.’’

सुशील भांदिगरे म्हणाले, ‘‘जुना बुधवार पेठेच्या वतीने आम्ही गेली अनेक वर्षे नदी प्रदूषण निवेदन, तसेच आंदोलन या मार्गे आवाज उठवत आहेत. अनेक वेळा दुधाळी नाला, तसेच विविध नाल्यांचे पाणी नदीत मिसळत असतांना आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही प्रशासनाने कधीच कृती केली नाही.’’ या संदर्भात शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘प्रशासन प्रत्येक वेळी गणेश विसर्जनास प्रशासन न्यायायालयाचे आदेश असल्याचे सांगते, तर अवैध भोग्यांच्या संदर्भात जो उच्च न्यायायालयाचा आदेश आहे त्यावर आजपर्यंत प्रशासनाने कोणती कृती केली ? प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन यांनी किती अनधिकृत भोंग्यावर कारवाई केली ? इचलकरंजीत नदीत रक् तमिश्रित पाणी मिसळते, तसेच कोल्हापूर शहरात विविध नाल्यांचे सतत मिळसते त्यासाठी पालिका प्रशासन काहीच कृती करत नाही. राज्यात कुठेही बॅरिकेटस घालून बंदी नसतांना केवळ कोल्हापूरात हा प्रयोग का ? तरी जनभावनेचा आदर करून प्रशासनाने विसर्जनास आडकाठी आणू नये.

महापालिका प्रशासनाकडून कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या श्री गणेशमूर्तींचा अनादर केला जातो. या मूर्ती पाय देऊन उचलल्या जातात. तरी त्यांची कोणत्याही परिस्थितीत हेळसांड होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी.’’बैठक झाल्यावर महापालिकेत शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची हिंदुत्वनिष्ठांशी भेट झाली असता त्यांनी यंदाही भाविक आणि गणेशभक्त श्री गणेशमूर्तीचे पंचगंगा नदीतच विसर्जन करतील, असे सर्वांना आश्‍वस्त केले.

या बैठकीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले आणि किशोर घाटगे, सेवाव्रत प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी(बंडा) साळोखे, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, ‘बुधवार पेठे’ चे सुशील भांदिगरे, अखिल भारत हिंदू महासभेचे राजेंद्र तोरस्कर आणि विकास जाधव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे तालुका समन्वयक शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह  आशिष लोखंडे, ‘मराठा तितुका मेळावावा’ चे योगेश केरकर, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक  निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि आदित्य शास्त्री उपस्थित होते.