सर्किट बेंचचे उद्घाटन झाले, आरोपी क्षीरसागरांपासून पहिली सुनावणी करावी - जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) - राजकारणामध्ये कार्यरत असणारा व स्वतःच्या स्वार्थाकरता जनतेबरोबर विकास कामाच्या गोंडस गप्पा करत टक्केवारीन स्वतःच उखळ पांढर करून घेणारे व उद्धवजींच्या पुण्याईने राज्य नियोजन मंडळाचा दर्जा प्राप्त करून मातृवत शिवसेनेला खंजीर खुपसून गद्दार टोळीत गेलेल्या क्षीरसागरांच्या शासकीय ताफ्यामध्ये त्यांच्या नावानं परिवहन खात्याकडे नोंद असणारी MHO9 FY3784 या काळ्या स्कॉर्पिओ गाडीला "पोलीस" असा शासकीय स्टिकर लावून वापरली जात आहे ? ही स्कॉर्पिओ महानगरपालिकेच्या दारामध्ये उघडमध्ये पोलीस असा फलक गाडीमध्ये दिसतो. लगेच दुसऱ्या ताफ्यामध्ये या गाडीला पोलीस हा फलक दिसत नाही. या स्कॉर्पिओ मधुन पोलीस लावलेल्या फलकामुळे कोण अडवणुक करत नसल्यामुळे खुन होऊ शकतो, गाडीतुन तस्करी होऊ शकते, गाडीतुन पैशाच्या बंगांची देवाण - घेवाण होऊ शकते व हिच गाडी बिल्डर - डॉक्टर - व्यापारी व अन्य कोणाच्याही दारात नेऊन त्यांच्याकडून खंडणी वसुल होऊ शकते. पोलीसांनी ताबडतोब क्षीरसागरांवर गुन्हा नोंद करुन इतकी वर्षे या स्कॉर्पिओचा वापर कोठे कोठे झाला याची सी.आय.डी. चौकशी करावी. खाजगी वाहनावर पोलीस लिहणे मोटरवाहन कायद्यानुसार १७७ कलम अंतर्गत तो गुन्हा मानला जातो. त्याला दंड किंवा इतर शिक्षा होवू शकते. सर्किट बेंचचे उद्घाटन झाले, आरोपी क्षीरसागरांपासून पहिली सुनावणी करावी असा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले पुढे म्हणाले, खरंतर दिवसाढवळ्या पांढरे शर्ट विजार जॅकेट घालून लूटमारी करणाऱ्या दरोडेखोराच्या या लुटमारीला पोलीस दलाची ही अक्षम्य डोळेझाक केलेली साथ म्हणायची का? असा प्रश्न आज कोल्हापूरच्या जनतेला पडलेला आहे. यांची पार्श्वभुमी पाहता बिल्डरांना धमकावणे, डॉक्टरांना धमकावणे, कंत्राटदारांना धमकावून पैसे काढणे, कंत्राटदारांना घरात बोलून बिलासाठी मारहाण करणे, सीपीआर ला हप्ते लावणे, मेडिकल बिलामध्ये लूट करणे, संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून याचबरोबर अनेक विविध मार्गाने शासकीय अधिकाऱ्यांना वाघाच्या धमकीन पैसे गोळा करणे. अशी उजळ माथ्याची पांढरी लूट करत असणारे क्षीरसागर गल्लीबोळातून त्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या उडवत जात असताना पोलीस दलाने त्यांना दिलेलं संरक्षण हे त्यांच्या लुटमारी या गाड्या बरोबर फिरवून दिलेलं समर्थन आहे का ? त्याचबरोबर त्यांच्या नावे खाजगी गाडीमध्ये शासनाचा पोलीस दलाचा अधिकृत शिक्का अथवा स्टिकर लावून सदरची गाडी ताफ्यात कशी काय फिरते याला पोलीस दल कशी काय परवानगी देतात हा सामाजिक व्यवस्थेला लागलेला फार मोठा प्रश्न आहे. खरंतर गुंडा पुंडांपासून सुरू झालेले हे राज्य न्यायव्यवस्थेची धिंडवडे काढत गल्ली कोपऱ्यावर टवाळखोरांच साम्राज्य पसरत असताना लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीची कायद्याची पायमल्ली करत असतील तर ही अक्षम्यच चूक म्हणावी लागेल.
मतचोरी व ईव्हीएमच्या मदतीने आमदार झालेले क्षीरसागर यांनी करोडो रुपयांची माया आपल्या या कुकर्मामधून उभा केली आणि प्रत्येक ठिकाणी याच अघोरी संपत्तीच ओंगळवाणं प्रदर्शन करत क्षिरसागर यांनी राजकारणाचा बाजार मांडलेला असताना त्यांना शासनाच्या एका सक्षम आणि गृहमंत्रालयाचे खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दलाने मूक संमतीने साथ द्यावी हे निंदनीय आहे. भूषण गवई सरन्यायाधीश यांच्या हस्ते परवा सर्किट बँकेच्या माध्यमातून कोल्हापूरकरांचं प्रलंबित स्वप्न पूर्ण झालं. खरंतर आपल्याला मिळालेल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या क्षीरसागर यांच्या विरोधात पहिलाच खटला या सर्किट बेंच मध्ये दाखल करता येईल.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याने काम करणाऱ्या पोलीस दलाने आपली निरपेक्ष सेवा कोल्हापूरच्या जनतेला देत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आणि गुंडापुडांना दाबत आपला दंडका चालवत जनतेसमोर निस्पृह बाण्याची भूमिका मांडायची गरज असताना अशा पद्धतीचे व्यवहार एका राजनैतिक अधिकाऱ्याच्या बरोबर करणे म्हणजे त्याच्या कार्याला आणि त्याच्या लूटमारीला दिलेली मूक पसंती आहे. क्षिरसागर यांच्या ताफ्यामधून त्यांच्या या खाजगी गाडीतून पुरवलं जाणार शासनाच्या स्टीकरसह संरक्षण हे उद्या जर कुठल्या कुकर्मामध्ये उघड झालं तर क्षिरसागर यांच्या या पापक्रमामध्ये सदरचे अधिकारीच व पोलीस दल तेवढेच दोषी समजले जाईल. राजकारण याहीपेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या माननीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने झालेल्या व उद्धवर्जीच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या शिवसेनेने या कोल्हापुरामध्ये गुंडपुंड लोकप्रतिनिधींना यापुढे सडेतोडच उत्तर दिलं जाईल व शासनाने अशा लूटमार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचं अक्षम्य धाडस करू नये अन्यथा शिवसेनेबरोबरच जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागेल.