अशोकराव माने ग्रुप तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये इंजिनिअरिंग, एमबीए, पॉलिटेक्निक, आयटीआय, फार्मसी, नर्सिंग, आयुर्वेदिक आदी महाविद्यालयांतर्फे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला.
प्रमुख पाहुणे अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या संचालिका एस. आर. चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. एस. आर. चौगुले, कॅम्पस डायरेक्टर प्रा. पी. बी. घेवारी, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. युवराज गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यदिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
तसेच नर्सिंगचे प्राचार्य प्रसाद फुटाणे, प्राचार्या सौ. आश्विनी कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाण्यावरती नृत्य सादर केले. सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ऑफिस स्टाफ व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.