सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहमीद मिरशिकारी उर्फ लालू हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक

सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहमीद मिरशिकारी उर्फ लालू हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहमीद मिरशिकारी उर्फ लालू हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत.

2024 मध्ये अब्दुलहमीद मिरशिकारी उर्फ लालू यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.

कोरोना काळात नागरिकांना अन्न, औषधे व इतर मदत पुरवण्यात अब्दुलहमीद मिरशिकारी उर्फ लालू यांनी पुढाकार घेतला होता. सुभाष नगरमधील सिरत मोहल्ला परिसरातील विविध स्थानिक समस्या सोडवण्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असणारे मिरशिकारी आता नवीन राजकीय दिशा स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.