सोने चांदीच्या दरात भूकंप, जाणून घ्या नवे दर

सोने चांदीच्या दरात भूकंप, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सोने आणि चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 151637 रुपये इतका आहे. आजच्या दिवशी सोन्याच्या दरात 3242 रुपयांची घसरण झाली आहे. काल सोन्याचा दर 154879 रुपये प्रति तोळा होता. 22 कॅरेट सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचा पाहायला मिळालं. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या दरात 3229 रुपयांची घसरण झाली असून याचा दर 154259 रुपयांवरुन 151030 रुपयांवर आला आहे. 

18 कॅरेट सोन्याच्या दराचा विचार केला असता याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात आज 2970 रुपयांची घसरण झाली असून दर 141869 रुपयांवरुन 138899 रुपयांवर आला आहे. बुलियन्स को इनच्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याच्या दरात  4350 रुपयांची घसरण झाली आहे. 

आयबीजेएच्या माहितीनुसार एक किलो चांदीचा दर 249907 रुपयांवरुन 13098 रुपयांच्या घसरणीसह 236809 रुपयांवर आला आहे. बुलियन्स को इनच्या माहितीनुसार चांदीचा एका किलोचा दर 235050 रुपये आहे. या वेबसाईटच्या माहितीनुसार चांदीच्या दरात 13120 रुपयांची घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीचं मुख्य कारण अमेरिकेच्या फेड रिझर्व्हच्या पतधोरणाची घोषणा आणि जागतिक गुंतवणूकदारांची सतर्कता हे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या दरात 1.22 टक्क्यांची घसरण होऊन  दर 4836 डॉलर प्रति औंसवर दर आले आहेत. चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून दर 75.75 डॉलर प्रति औंसवर आले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा एका तोळ्याचा दर 155000 रुपयांच्या दरम्यान आहे. तर, चांदीचा एका किलोचा दर 250000 रुपये किलोवर पोहोचला आहे. 

अमेरिकन फेड रिझर्व्हनं सलग दुसऱ्यांदा व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. 18 मार्चला झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात  आला. अमेरिका- इस्त्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम देखील सोने आणि चांदीच्या दरावर दिसून येत आहे. अमेरिका इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळं शेअर बाजारावर देखील परिणाम झाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात देखील घसरण होत आहे. दुसरीकडे क्रूड ऑईलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं पाहायला मिळतं.