Big Boss Marathi : प्रेक्षकांचा राकेश बापटला पाठिंबा अन् अनुश्रीला घराबाहेर काढण्याची मागणी

Big Boss Marathi : प्रेक्षकांचा राकेश बापटला पाठिंबा अन् अनुश्रीला घराबाहेर काढण्याची मागणी

Big Boss Marathi Update News - बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच वादाचे प्रतिसाद उमटत असल्याचे पहायला मिळत आहेत. अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आजच्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात प्रचंड वाद झाल्याचे दिसून येत आहे. घरात नेहमी शांत राहणारा राकेश इतका का चिडला असेल..? या भांडणात नेमकी कोणाची बोलती बंद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. घराच्या बाहेर प्रेक्षकांकडून राकेश बापटला पाठिंबा मिळत आहे. तर, अनुश्रीला तिच्या उद्धटपणामुळे आणि सतत शिव्या घालून बोलण्याच्या स्वभावामुळे घराबाहेर काढण्याची मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. येत्या भाऊच्या धक्क्यात रितेश देशमुख कोणाची कानउघडणी करणार या चर्चांना मनोरंजन विश्वात उधाण आलेलं पहायला मिळत आहे. 

https://www.instagram.com/reel/DTzQZbACFmC/?utm_source=ig_web_copy_link

प्रोमोमध्ये राकेश बापट हा संतापलेला दिसत असून घरातील कामाच्या मुद्द्यांवरून अनुश्रीवर निशाणा साधला. घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे..? असा प्रश्न त्याने घरातील सर्व सदस्यांसमोर उपस्थित केला आहे. राकेशचा हा अवतार पाहून घरातील सर्वच सदस्य आश्चर्यचकित झाले दिसत आहेत. तर आपली बाजू मांडण्यासाठी अनुश्रीही राकेशला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे राकेश आणि अनुश्रीमध्ये चांगलेच घमासान सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.