‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये नॉमिनेशन टास्कने उडवला गोंधळ ; सागर कारंडे - तन्वी यांच्यात तुफान राडा
मुंबई - ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 मध्ये नॉमिनेशन टास्क सुरू होताच घरातील शांतता पूर्णपणे भंगली आहे. पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत सदस्यांमधील लपलेले मतभेद समोर येऊ लागले असून, आरोप - प्रत्यारोप आणि रणनीतींमुळे खेळाला वेगळंच वळण मिळालं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये सागर कारंडे आणि तन्वी यांच्यातील तीव्र वाद प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतोय. प्रोमोमध्ये दिसतं की पहिल्या नॉमिनेशन टास्कदरम्यान तन्वीने सागर कारंडेचा फोटो असलेली पतंग कापली. इतकंच नव्हे तर, सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत, असं धक्कादायक विधान तिने केलं. या वक्तव्यामुळे सागर प्रचंड संतापलेला पाहायला मिळतो.

तन्वीच्या आरोपांना उत्तर देताना सागर म्हणतो, एवढी तरी अक्कल पाहिजे की आपण काय बोलतोय! यावर तन्वीही मागे हटत नाही. मी नॉनसेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाही, असं ठामपणे सांगत ती वाद अधिक चिघळवते. वादाच्या भरात सागर तिला मध्ये न बोलण्याचा इशारा देतो आणि, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी बोलताना मध्ये बोलायचं नाही, असं म्हणतो. त्यावर तन्वी सडेतोड उत्तर देते, मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार नाहीस.
https://www.instagram.com/reel/DTezF7-CNiX/?utm_source=ig_web_copy_link
साधारणपणे शांत राहणारा सागर आणि आक्रमक स्वभावाची तन्वी यांच्यातील हा संघर्ष घरातील समीकरणं बदलणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नॉमिनेशनच्या भीतीपोटी सदस्य एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत का, असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. या वादाचे परिणाम काय होतील, कोण होणार नॉमिनेटेड आणि कोण राहणार सेफ, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.




