अखेर जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला
कोल्हापूर (प्रतिनिधी) : बरेच वर्षे रखडलेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अखेर जाहीर झाली असून राज्यातील पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. पुणे विभागातून सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे अशा पाच जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाने तारीख निश्चित केली असून पुढील प्रमाणे :
उमेदवारी अर्ज दाखल करणे- 16 जानेवारी ते 21 जानेवारी
छाननी : 22 जानेवारी
उमेदवारी अर्जांची माघार: 27 जानेवारी
चिन्ह वाटप :27 जानेवारी
मतदान: 5 फेब्रुवारी तर
निवडणूक निकाल: 7 फेब्रुवारी जाहीर होणार आहे. महानगरपालिकेच्या प्रचाराचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रचाराचा धुरळा उडणार आहे.




