स्वतः बरोबर समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय .. - विश्वासराव पाटील

स्वतः बरोबर समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय .. -  विश्वासराव पाटील

करवीर (विश्वनाथ मोरे) - कोगे तालुका करवीर येथे कै. प्रकाश कुंडलिक पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली .या परीक्षेसाठी कोगे व आसपासच्या सहा शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या परीक्षेच्या उद्घाटन समयी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वासराव पाटील हे होते .यावेळी बोलताना विश्वासराव पाटील म्हणाले स्वतः बरोबर समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही .यासाठी विश्वास दत्तात्रय पाटील यांनी हा शिष्यवृत्ती परीक्षेचा घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोकुळचे संचालक व कुभी बँकेचे चेअरमन अजित नरके यांनी विद्यार्थ्यांनी भरपूर खेळणे व खेळाबरोबर मोजका अभ्यास करणे आवश्यक असल्याचे सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते, यासाठी भरपूर खेळले पाहिजे असेही सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे गोकुळ माजी अध्यक्ष व संचालक विश्वासराव पाटील, गोकुळ संचालक व कुंभी बॅक चेअरमन अजित नरके, डॉ .सरदार पाटील, गट शिक्षण अधिकारी अर्चना पाथरे , त प्रकाश ऑग्रे, सरपंच वंदना इंगवले, माजी अध्यक्ष तानाजी पाटील यांचा विश्वासराव पाटील युवा मंचच्या मार्फत आणि कन्या व कुमार शाळेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यशश्री तानाजी पाटील या विद्यार्थिनीच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या पिंक रूमचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम पाटील, स्वागत राजेंद्र तौंदकर व आभार म्हेतर यांनी मानले. 

यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज मांगोरे, एकनाथ यादव, गोकुळ महालक्ष्मी पशुखाद्य व्यवस्थापक विलास पाटील, कुंभी कासारी साखर कारखाना संचालक विश्वास दतात्रय पाटील, केंद्रप्रमुख राजेश्वर थोरबोले, सरपंच वंदना इंगवले, उपसरपंच कृष्णात फडतारे, शालेय व्यवस्थापन समिती  सदस्य संजय मोरे, टी एन पाटील, नामदेव पाटील, रणजीत पाटील व सर्व सदस्य आदी तसेच कन्या व कुमार मुख्याध्यापक , स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.