कै. किरणराव माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत शालेय साहित्य वाटप व शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

कै. किरणराव माने यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत शालेय साहित्य वाटप व शिक्षक सत्कार सोहळा संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शिवाजी पेठेतील श्री अवचित पीर तालीम मंडळाच्या वतीने कै. किरणराव माने, शाखा प्रमुख – बुलंद दरवाजा शिवसेना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 60 विद्यार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले.

कार्यक्रमावेळी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त सागर बगाडे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आणि तालमीचे माजी अध्यक्ष मंजीत किरण माने यांनी केले होते. 

यावेळी अध्यक्ष जयंत भोसले, उपाध्यक्ष आशिष हेरवाडकर, विकास सूर्यवंशी, विनायक साळोखे, सुजित चव्हाण, ललित सरनाईक, अमित इंगवले, वैभव जाधव, शुभम मोरे, अथर्व साळोखे तसेच इतर माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.