पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचे ठरेना व कॉग्रेस पक्ष उमेदवार देईना ?
करवीर तालुका (विश्वनाथ मोरे) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निवडणुकीची सुगी सुरू झालेली आहे .नगरपालिका निवडणूक झाली,महानगरपालिका सुरु आहे .व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक सुरू होणार आहे .त्यामुळे प्रत्येक जण जुळवा जुळवीच्या राजकारणामधून आपण बाजी कशी मारणार ? यासाठी रस्सीखेच चालू आहे .महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने दावा केलेला आहे की महायुतीची सत्ता येणार ? तर महाविकास आघाडीने आपली सत्ता येणार ? असे सुतोवाच केले आहे . पण खरी लढत व ईर्षा जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून पाडळी खुर्द मतदारसंघातच दिसून येते आहे.

पाडळी खुर्द मतदारसंघांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे .कारण यामध्ये गोकुळ मधील कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील,माजी पंचायत समिती सभापती व सदस्य राजेंद्र सूर्यवंशी,सामाजिक कार्य करत नवीन नेतृत्व निर्माण करणारे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. के एन पाटील याची वर्णी लागली आहे . अशा सामाजिक,राजकीय,व औद्योगिक विभागातून स्वतःचे वेगळे नाव बनवलेले मातब्बर यांच्यामध्ये लढत होणार आहे.
पण सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये हे तिन्हीही उमेदवार हे महायुतीचेच आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही . यामध्ये गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार होता, पण काही तांत्रिक बाबीमुळे तो 17 जानेवारी रोजी होणार असे खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .यामध्ये जर - तर चा अभाव दिसून येत आहे .तर दुसरीकडे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हे काँग्रेसमध्ये निवडून आले होते सध्या ते अजित पवार गट राष्ट्रवादी मधून उभारणार असल्याचे दिसत आहे ? पण तसा त्यांनी अजून ठोस निर्णय घेतलेला व पक्ष प्रवेश केलेला नाही .यामध्ये भारतीय जनता पार्टी मधून उमेदवारी म्हणून उभे राहणारे डॉ . के एन पाटील, हे सर्व उमेदवार व अपक्ष कसबा बीड गावचे मुकुंदराव पाटील, पाडळी खुर्दचे पृथ्वीराज सुर्यवंशी, आरे गावचे संतोष पोर्लेकर आदी आपल्या वैयक्तिक पातळीवर सद्यस्थितीला प्रचारामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे .
एकंदरीत वरील उमेदवारांमध्ये मातब्बर तिन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टी,शिंदे गट,व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आहेत.यामध्ये महायुतीचा एक उमेदवार उभारणार ? का मैत्रीपूर्ण लढत होणार ? जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेस मधून कोण लढणार ? यावर प्रश्नचिन्ह आहे .
पाडळी खुर्द मतदारसंघांमध्ये शिंदे गटाला तिकीट मिळणार ? की राष्ट्रवादी गटाला मिळणार ? हे निश्चित झालेले नाही .त्यामुळे या तिघांपैकी ज्या उमेदवाराला तिकीट मिळणार नाही,तो काँग्रेस पक्षाचा दावेदार असू शकतो ? त्यामुळे सध्या महानगरपालिका निवडणुका असल्यामुळे याकडे कॉग्रेस जिल्हाध्यक्षांनी म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही .म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत ही महायुतीतच होणार ? असे स्पष्ट दिसत आहे .पण यामधून नाराज असणारे व ज्यांना तिकीट मिळाले नाही ते काँग्रेस मधून उभे राहिले तर फायदा कोणाचा होणार ? निवडून कोण येणार ? अपक्ष उमेदवारांमुळे कोणाची मते कमी होणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष राहिले आहे .
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील व शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके , कुंभी कासारी साखर कारखाना या मतदारसंघात असणारे संचालक,गोकुळचे संचालक व कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके असे प्राबल्य असणारे नेते व नामदार हसनसो मुश्रीफ,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील,माजी पंचायत समिती सभापती व सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हेही तितक्याच तुल्य बळाचे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये होणारे चित्र पहावयास मिळणार आहे . आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन प्रचार करणारे डॉ .के एन पाटील यांना जर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार की नाही ? पाठींबा दिला नाही तर ते अपक्ष उभारणार का ? का काँग्रेस पक्षासोबत युती करणार ? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे .नेते मंडळींची सध्याची असणारी प्रचार यंत्रणा ही त्यांच्या परीने बरोबरीची असली तरी सुद्धा यामध्ये योग्य ते मोजमाप करून जनतेसाठी आवश्यक असणारा पाडळी खुर्द मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून येणार ? हे मतदार राजा अचूक शोधून काढेल असे चित्र दिसून येत आहे .




