शरद इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रिडा स्पर्धेत यश

शरद इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रिडा स्पर्धेत यश

यड्राव (प्रतिनिधी) - यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रिडा स्पर्धेत यश मिळविले आहे. विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय, विद्यापीठीय संघात निवड झाली आहे. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केला.

यामध्ये सातारा येथे झालेल्या इंटर झोनल कुस्ती स्पर्धेत अर्जुन जाधव (मुले) व बुध्दा कोरवी (मुली), सोलापूर येथे झालेल्या बुध्दीबळ स्पर्धेत रोहित बुडके, धुळे येथे झालेल्या बॉक्सींग स्पर्धेत अर्जुन रजपूत, ट्रीपल जंपमध्ये अथर्व आवटे, उंच उडीमध्ये कार्तिक स्वामी यांनी सुवर्ण पदक मिळविले. या सर्व विजेते विद्यार्थी यांची विद्यापीठीय संघात निवड झाली आहे. तसेच ओंकार पाटील याची विद्यापीठीय कब्बडी संघात निवड झाली आहे. 

सातारा येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रणव पाडेकर, पियुष चिखले, सोलापूर येथे झालेल्या ज्युदो स्पर्धेत प्रणव पाडेकर, साईनाथ डफले यांनी कास्य पदक पटकाविले. मेढा येथे झालेल्या बुध्दीबळ स्पर्धेत मुलांच्या गटात स्वप्निल बुडके (व्दितीय), रोहित बुडके (चौथा), मुलींच्या गटात पूजा ठोमके व्दितीय क्रमांक मिळविला. 

अॅथलेटीक स्पर्धेत अथर्व आवटे (लांब उडी, ट्रीपल उडी) कार्तिक स्वामी (भालाफेक), प्रणिता शेटे (ट्रीपल जंप) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आदित्य सावळे (२०० मीटर धावणे) व्दितीय, हिना मुजावर (२०० मीटर धावणे) तृतीय क्रमांक मिळविला. 

महिला रिलेमध्ये स्पर्धेत सानिया गाट, पुर्वा पोवार, समिक्षा वाके, हिना मुजावर तर पुरुष रिलेमध्ये अथर्व आवटे, अदित्य पाटील, पियुष गुप्ता, अदित्य सावळे या दोन्ही संघांनी कास्य पदक पटकाविले.

कोल्हापूर विभागीय संघात अंकीता जाधव (टेबल टेनिस), सोनिया नारायणकर (टेबल टेनिस), आयुष मनोळे (बँडमिंटन) निवड झाली आहे. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्र. प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे, क्रिडा विभागप्रमुख प्रा. एस.बी. हेरवाडे, प्रा. वर्षा जुजारे, प्रशिक्षक प्रा. दादासाहेब मगदून यांच्यासह सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.