शरद कृषीच्या शुभम चव्हाणला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक
जैनापूर - जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम दीपक चव्हाण याने आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग या स्पर्धेत ६९ किलो वजन गटामध्ये १९५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. त्याची विद्यापीठ संघामध्ये निवड झाली आहे. तसेच विवेक अमोल पाटील याने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ८५ किलो वजनी गटामध्ये रौप्यपदक पटकावले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व बॉडी बिल्डिंग स्पर्धा ह्या श्रीमन शिवाजीराजे कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण येथे पार पडल्या. यामध्ये शरद कृषीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
विद्यार्थ्यांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य प्रा. संजय फलके व क्रीडा शिक्षक प्रा. दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.




